मदकरी नायक आणि शिवाप्पा नायक हे कर्नाटकातील नायकांचे प्रमुख राजे होत. हे नायक मूलतः आंध्र-प्रदेश च्या तिरुपती जवळच्या टेकड्यांतील शुष्क आणि दुष्काळी भागात राहत होते. हे लोक मल्लिकार्जुनचे निस्सीम भक्त होते. नंतर यांनी कर्नाटकाच्या पश्चिम घाटात स्थलांतर करून या भागात राज्य केले.
आंध्र-प्रदेशातील सध्याचे भोयार/बेडर हे यांचे पूर्वज.महाराष्ट्रातील रामवंशी(रामोशी) वंशाच्या नायकांचे मूळ सुद्धा यांच्यातच आहे. मदने,भोसले,गायकवाड,खोमणे हि रामवंशी लोकांची प्रमुख आडनावे.यांपैकी मदने सोडून इतर सर्व आडनावे इतर समाजात आढळतात. याचा अर्थ मदने लोक त्यांच्या प्राचीन परंपरेनुसार आंध्र-प्रदेशातील दुष्काळी भागात सुद्धा निवास करत होते. तसेच बरेच मदने लोक महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या पश्चिम घाटक्षेत्रात सुद्धा घुसले होते.
मदने हे आडनाव इतर समाजात न आढळण्याचं कारण म्हणजे हजारो वर्षांच्या काळात मुख्य जमातीच्या अनेक पोटजमाती निर्माण झाल्या आहेत.वनात भटकत असताना मदने लोकांचा पश्चिम घाटातील आदिवाशींशी थेट संपर्क आला. नंतर आदिवाशींमध्येही पोटजमाती निर्माण होऊन या पोटजमाती मदने यांच्यापासून दुरावत गेल्या आणि अनेक उप-आडनावं निर्माण झाली.मदनेंच्या बाकी पोट -जमाती एका जागी स्थिर झाल्या होत्या परंतू मदने यांना एका जागी स्थिर होणे मान्य नव्हते. फक्त रामवंशी लोकच मदने यांच्या शेवटपर्यंत सोबत राहिले.अर्थात काही मदने एका ठिकाणी स्थिर होऊन नागरी जीवन सुद्धा उपभोगत होते.
तसेच भारतातील अनेक राजवंशानी काल्पनिक कथा निर्माण करून त्यांचा संबंध काल्पनिक वंशाशी जोडला. पुढे मूळ आडनाव पुसले जाऊन तेच आडनाव कायम राहिले.
रामवंशी लोकांची भोसले,गायकवाड,खोमणे हि आडनावे फार नवीन आहेत. गायकवाड या आडनावाचा संबंध आंध्र-प्रदेशातील काकतीय राजवंशाशी आहे. मदने,भोसले,गायकवाड इत्यादी. आडनावे सिमा भागातील लातूर,बिदर ,गुलबर्गा आणि अगदी हैद्राबाद पर्यंत आढळतात. तसेच मालुसरे हे आडनाव शिवकाळामुळे लोकांच्या समोर आले. हे आडनाव ठराविक भागातच आढळते.नंतरच्या पेशवाई,होळकरशाही,शिंदेशाही आणि पानिपतच्या युद्धात या आडनावाचे संदर्भ मिळत नाहीत.
नायक लोक हे स्वतः दुष्काळी भागात जीवन व्यतित करून सुपीक भागातील लोकांचे रक्षण करत असत.
No comments:
Post a Comment