Sunday 26 January 2020

असा घडला महाराष्ट्र(प्राचीन औंड्र,पुंड्र आणि कदम वंशाचा इतिहास)



असा घडला महाराष्ट्र(प्राचीन औंड्र,पुंड्र आणि कदम वंशाचा इतिहास)
महाराष्ट्र हे देशातील अतिशय महत्वाचे राज्य. जेव्हा देशावरती आणि संस्कृतीवरती संकट आले त्यावेळेस महाराष्ट्रच पुढे आला होता.महाराष्ट्र आणि प्राचीन तुर्कीची "हट्टी" भूमी यात बरेच साम्य आहे. हट्टी भूमी हि सुद्धा महाराष्ट्राप्रमाणे डोंगराळ आणि झाडाझुडपांनी व्याप्त होती. याठिकाणी अनेक गढ किल्ले होते. विंध्याच्या दक्षिणेकडील धार,मराठवाडा ,कर्नाटक आणि आंध्र प्रदेश चा सीमावर्ती भाग हा दंडकारण्याने व्याप्त होता. या भागाचे प्राचीन नाव "मर-हट्टी" भूमी हे होते. "मर-हट्टी" हा कानडी शब्द आहे. मर म्हणजे झाडेझुडपे आणि "हट्टी" म्हणजे वसाहत. "मर-हट्टी" म्हणजे झाडाझुडपांनी व्याप्त वसाहत. मूळ मराठा योद्धे याच भागात उदयाला आले. या भागाच्या पश्चिमेककडील भाग हा सुपीक प्रदेश होता. या भागात धनगर आणि कुणबी/माळी लोकांची वसाहत होती.
ईसवी.सन. पुर्व ५०० सालांपासून ते इसवी पाचव्या शतकापर्यंत शक आणि हुण लोक भारतात येऊ लागले. शक लोक नंतर दक्षिणेकडे आले. त्यांनी इथल्या सातवाहन साम्राज्य आणि मल्ल जमातीचा पराभव केला. सातवाहन हे औंड्र(वडार) वंशी होते.शक लोक हे मूळचे सिरियातील. पुढे असुर(असेरियन) लोकांनी त्यांना हाकलून लावल्यावरती हे मध्य-आशियात आले. शक हे मुळात काळेसावळे होते. त्यामुळे त्यांच्यात "काळे" हे प्रमुख आडनाव सापडते. मध्य-आशियात त्यांनी इथल्या गोऱ्या आणि उंच महिलांशी विवाह करून गोरी आणि धिप्पाड मुले निर्माण केली. भारतात येताना प्रमुख वर्ग वगळता हे लोक अविवाहित मुलांना घेऊन आले कारण अविवाहत मुलांना आणले तर सोबत महिला नसल्यामुळे गति अधिक प्राप्त होते. बाकीची मुले मध्य-आशियातच ठेवली. पुढे याच मुलांनी भारतावरती आक्रमण केले. हि मुले म्हणजेच गोरे,उंच आणि धिप्पाड तुर्क आणि मोगल लोक.निसर्गाच्या नियमाप्रमाणे नदी शेवटी समुद्राला मिळतेच.
इतिहासात या घटनेशी साम्य असणाऱ्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. पारसी पुराणांत रुस्तुम ने एका वनातील महिलेशी लग्न करून तिला गरोदर अवस्थेत सोडून दिले. पुढे मुलगा सोहराब ने आपल्या वडिलांशीच युद्ध करून त्यांना हरविले हि कथा आहे. आपल्याकडे लव आणि कुशची कथा प्रसिद्ध आहे. शेवटी नदीचे पाणी समुद्राला मिळतेच हा निसर्गाचा नियम आहे.
शक लोक काळेसावळे असल्यामुळे आपले राम,कृष्ण आणि विठ्ठल हे देव काळे-सावळेच होते. गोऱ्या अविवाहित मुलांनी भारतातील मल्ल या जमातीच्या महिलांशी विवाह करायला सुरुवात केली (याला अनुवांशिक आधार आहे) परंतू विवाहाचे प्रमाण फार कमी होते कारण वंश चालवायला एका पुरुषाच्यासाठी एक महिलासुद्धा पुरेसी असते. पुढे काळेसावळे लोक सुपीक भागात राज्य करू लागले आणि गोऱ्या लोकांना सीमावर्ती भागात रक्षणासाठी ठेवण्यात आले. सुपीक भागातील राज्य करणाऱ्या धनगर आणि माळी/कुणबी या प्रमुख जमाती होत्या. धनगर लोक जहागीरदार तर माळी/कुणबी हे पाटील असायचे. धनगर हे प्रशासन चालवायचे तर माळी/कुणबी हे शेतीची कामे आणि बलुतेदारांचे नेतृत्त्व करायचे.ते लोकांचे प्रश्न धनगरांपुढे मांडायचे. धनगर म्हणजे धनाचे-आगार. माळी हा शब्द "मल्ल" या जातीवरून आला असावा. मल्ल-मळा-माळी असा विकास होता गेला असावा. धनगर,माळी आणि कुणबी हे शब्द पेशवाईच्या अगोदर इतिहासात लिखित स्वरूपात कुठेच सापडत नाहीत कारण हे शब्द स्थानिक पातळीवरती एखाद्या कुटुंबासाठी वापरले जायचे कोणत्याही एका विशिष्ट जमातीसाठी नव्हे. शासक लोकांनी जास्त महिला आणल्या नसल्यामुळे त्यांनी काही प्रमाणात मल्ल जमातीतील महिलांशी विवाह केले होते. त्याकाळात थोड्या प्रमाणात धनगर आणि माळी/कुणबी या लोकांत विवाह होत असत कारण अगोदर पूर्णतः पशुपालन करणाऱ्या धनगरांचा आणि नंतर जहागिऱ्या संभाळणाऱ्यांचा वंश २०० वर्षानंतर पूर्णपणे शेतकरी बनून कुणबी किंवा माळी बनण्याची प्रक्रिया सुरु होत असे.
धनगर लोकांच्या गढ्या आजही मराठवाड्यात प्रसिद्ध आहेत. माझ्या गावात पांढरे हे आडनाव माळी समाजात आढळते. हे पांढरे म्हणजे मूळ "पुंड्र" वंश ज्यांनी पंढरपूरची स्थापना केली होती.माझे गाव पंढरपूर पासून फार जवळ आहे. पंढरपूर हे आपल्यासाठी मक्केप्रमाणेच आहे. राजे-पांढरे हे आडनाव शिखर-शिंगणापूर जवळच्या धनगर समाजात मोठ्या प्रमाणात आढळते. पहिल्या शाहूंच्या काळात राजे -पांढरे हे पराक्रमी धनगर सरदार घराणे होते.
कदम हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आडनाव. कदम हे आडनाव महादेव-कोळी, मराठा-कुणबी आणि दलित समाजात मोठ्या प्रमाणात आढळते. महादेव-कोळी हे देवीचे आणि विठ्ठलाचे प्राचीन पुजारी.आजही विठ्ठलाच्या पूजेचा मान महादेव-कोळी समाजाकडे आणि तुळजाभवानीच्या पूजेचा मान भोपे(कदम) पुजाऱ्यांकडे आहे. भोपे(कदम) हे मराठा आहेत. भोप हि राजस्थानात एक जमात पण आहे. मरीआईचे पुजारी आजसुद्धा दलित समाजातील आहेत.
कदंब हे प्राचीन कुळ धनगरांत पण मोठ्या प्रमाणात आढळते.कदम हे आडनाव माळी समाजात मात्र आढळत नाही कारण कदम हे नागरी परिक्षेत्राच्या बाहेर राहत होते.मुस्लिम सुलतान आणि मराठा साम्राज्यात कदम हे जहागिऱ्या मिळवून सुपीक प्रदेशांत घुसू लागले.

मदने हे सुपीक प्रदेश सोडून दक्षिण-पूर्वेला "मर-हट्टी" भूमीत राहायचे. याच भूमीत बरेच राजवंश निर्माण झाले.उत्तरेला धार आणि दक्षिण-पूर्वेला मराठवाडा आणि कर्नाटक-आंध्र चा सीमावर्ती भाग हा मरहट्ट भूमी होती. हे लोक मराठी,कन्नड आणि तेलगू या तिन्हीही भाषा बोलायचे.
हा भाग उंच आणि तगड्या हटकर आणि मराठा योध्यांनी व्यापला होता. हे लोक आपल्या सैनिकांप्रमाणेच सीमावर्ती भागात राहून राज्यांचे रक्षण करायचे ज्याप्रमाणे आपले सैनिक दुर्गम भागात राहून देशाचे रक्षण करायचे.मुळात हे लोक गोरे शक पुरुष आणि द्रविड महिलांच्या विवाहसंबंधातून निर्माण झाले होते आणि नागरी जीवनापासून दूर राहत होते.
नेपाळ आणि उत्तराखंड भागात गोरख्यांचा वर्ग हि याच प्रकारे निर्माण करण्यात आला होता.
मगर हे मुस्लिम सुलतानांनी नेपाळ मधून आणलेले योद्धे. मध्य-प्रदेश आणि महाराष्ट्र हा नेपाळप्रमाणेच डोंगराळ भाग असल्यामुळे मुस्लिम सुलतानांना हा भाग जिंकून घ्यायला मगरांचा फार वापर झाला.मदने हे दक्षिणेकडून त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आले होते. नंतर मगर आणि मदने यांनी स्वराज्यासाठी एकत्र लढण्याचे ठरविले. या दोघांचेही स्वराज्याच्या इतिहासात कुठेच नाव नाही कारण या लोकांनी अनेक योद्धे घडविले परंतू जहागिरदाऱ्या घेतल्या नाहीत.यांनी अनेक लोकांना जहागिरीच्या गादीवरती बसविले.स्वराज्याचे मुख्य सूत्रधार हेच लोक होते. या दोन घराण्यांचा वंश एवढा कमी झाला कि यांची आता महाराष्ट्रात फक्त दोनच गावे उरली आहेत आणि तीही अगदी जवळजवळ. मदने हे दक्षिणेला राहतात तर मगर हे उत्तरेला. महाराष्ट्रात जेवढे काही मदने आणि मगर आहेत ते ह्याच दोन गावातून गेलेले आहेत.
स्वराज्याच्या लढ्याचे मुख्य-सूत्रधार मगर आणि मदनेच होते. कदाचित मदने आणि मगर हेच मूळचे मदन-मोहन असावेत आणि संपूर्ण जग जेव्हा बुडायची वेळ येईल तेव्हा हेच दोन वंश परत सभ्यता घडवतील. आता मगर हे मराठा आहेत परंतू काही शेकडो वर्षानंतर हे लोक आपआपसांत लग्न करतील .नंतर मदने आणि मगर यांत मतभेद होऊन युद्धे होतील. परत याच लोकांतून चीन,अरब,युरोप इत्यादी. वेगळे देश निर्माण होतील. कारण ४०० वर्षांपूर्वी सरदार लोक जात/वंश न पाहता आपआपसांत लग्न करायचे.मगर लोकांत मंगोल महिलावंश जास्त आहे तर मदने लोकांत अरब महिलावंश जास्त आहे. त्यामुळे याच लोकांतून परत नंतर वेगळे देश निर्माण होतील. एक दिवस हि दोन्हीही गावे जगाची राजधानी बनतील याची मला खात्री आहे कारण सध्या जागतिक तापमानवाढीमुळे मुंबई सारखी समुद्रकिनारी असणारी मोठी शहरे बुडण्याच्या मार्गावरती आहेत. चीन ला सुद्धा वाढत्या प्रदूषणाचा आणि लोकसंख्येचा धोका आहे. अरबस्तानातील वाढत्या तापमानवाढीमुळे अजून १०० वर्षानंतर लोक तिथे राहू शकणार नाहीत. अन्न आणि पाण्यासाठी भयंकर युद्धे होतील.
उत्तरेला सिंध प्रांतात जी सध्या मोहना जमात राहत आहे ती परत इतिहास घडवू शकते. कारण हे जग गोल आहे आणि वारंवार इतिहासाची पुनरावृत्ती होते.
दक्षिण पूर्वेकडील "मर-हट्टी" देशातील मराठा योद्धे मुस्लिम सुलतानांचे सरदार बनले आणि पश्चिमेकडे घुसले.पश्चिम भागातील प्रदेशांची प्राचीन नावे हि करहाटक,कुंतलदेश ,कोंकण अशी होते. महाराष्ट्र अलीकडे निर्माण झालेले मर-हट्टीचे संस्कृत रूप होय.
याबद्दल विस्ताराने एक ग्रंथच लिहावा लागेल. येथे थोडक्यात सांगायचे म्हणजे हे दोन प्रमुख समाज म्हणजे येथील आद्य-वसाहतकार आहेत. या लोकांच्या पूर्वजांनी येथील वनांत आणि डोंगरदऱ्यांत वसाहती घडविताना फार मेहनत घेतलेली आहे. आज सामाजिक द्रुष्ट्या अवनतीला पोहोचलेला, नव्या युगात जीवनसंघर्षात व्यस्त झालेल्या या समाजाला आपले मुळ स्वरुप कळायला हवे यासाठी हा प्रपंच. जवळपास ८व्या शतकापर्यंत या समाजाने राजकीय व आर्थिक द्रुष्ट्या महाराष्ट्राला वैभव प्राप्त करुन दिले. महाराष्ट्रातील लोककला/नाट्य/संगीताचे मुळ जनक हेच. यांचे मौखिक साहित्य/दंतकथा आजही अंधारात आहेत. आपले पुर्ववैभव आणि निर्मितीची क्षमता विसरत गेली आहे कि काय?
मला एकच सांगायचे आहे...बाबांनो तुमचे पुर्वज येथील आद्य वसाहतकार आहेत. त्यांनीच येथील संस्क्रुतीची सुरुवात केली. त्यांनीच अवाढव्य राजसत्ता स्थापन केल्या. ज्यांचे जीवंत पुरावे आजही विश्वाला चकित करत आहेत अशा वास्तु निर्माण केल्या. तुमच्या पुरातन वारशांचे अपहरण झाले आहे...होत आहे...आणि तरीही तुम्ही गप्प आहात. असे होतेय याचे एकमेव कारण म्हनजे तुम्ही तुमची अस्मिता विसरला आहात. इतिहास ध्यानी ठेवलाच नाही. त्याची पुनराव्रुत्ती वेगवेगळ्या अंगाने करायची असते याची जाण विसरलात...
आता तरी जागे व्हाल?


No comments:

Post a Comment