Sunday 26 January 2020

उज्जैन आणि धारचे प्राचीन वंश



काळे(कार्दमक वंश) ---सुमारे ३५० वर्षे उज्जैन वरती शासन करणारा वंश. फार प्राचीन वंश आहे हा. फार प्राचीन काळापासून हे लोक कालीचे पुजारी आहेत. परंतू संस्कृती करणामुळे आता तेथील पुजाऱ्यांची आणि तेथील लोकांची आडनावे बदलली आहेत. माझा एक काळे आडनावाचा मित्र आहे तो सांगतो कि १५ व्या शतकात हे लोक उज्जैन मधून आले आणि त्यांना नगर जिल्ह्यात वतने मिळाली होती. गुप्त राजांनी त्यांचा पराभव केल्यावरती बरेच काळे हे पाचव्या शतकातच दक्षिणेकडे आले होते. काळे हे कालीला मानणारे तर गुत शासक हे वैष्णव होते. माझ्या आजोळचे आडनाव काळे आहे.
पवार -----परमार वंश
परमार हे सुरुवातीला राष्ट्रकूटांचे सामंत होते. इतिहासकारांच्या मते हा मूलतः दक्षिण भारतीय वंश आहे परंतू नंतर या वंशाचे संस्कृतीकरण झाल्यामुळे याचा सबंध अग्निवंशाशी जोडला गेला आहे.अग्निवंशाच्या मिथकाची कथा परमारांच्या काळात प्रचिलित नव्हती.कोणत्याही परमार शासकाने अग्निवंशाच्या मिथकाबद्द्ल एक अक्षर हि लिहिले नानव्हते परंतू परमारांच्या सुमारे ४०० वर्षानंतर म्हणजे १५ व्या शतकात हि कथा निर्माण केली गेली आहे. पवार/पोवार हे आडनाव महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्र-प्रदेशाच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात सापडते. या भागातील पवार आडनावाच्या लोकांत अंबाजी,लिंबाजी, निंबाजी इत्यादी.आडनावे मोठ्या प्रमाणात सापडतात. अंबा आणि काली या लोकांच्या मुख्य देवता आहेत. दक्षिण भारतातील मुदिराज समाजाच्या सुद्धा याच देवता आहेत.
धारच्या परमार वंशाच्या सुरुवातीच्या शासकांची नावे अवैदिक होती हे सिद्ध करतात कि परमार हे मूलतः दक्षिण भारतीय वंशाचे होते.
सुरुवातीचे परमार शासक
१. सियाका
२. वाक्पती उर्फ वप्पीराजा उर्फ बप्पीराजा
३. मुंजा


No comments:

Post a Comment