आज तान्हाजी हा चित्रपट बघितला म्हणून मला शिलाहार राजांची आठवण झाली. उत्तर कोकणातील योद्धे घडविण्यात शिलाहार राजांचे महत्त्वाचे योगदान आहे. मालुसरे हे आडनाव सुद्धा फक्त उत्तर कोकणातच आढळते.या भागातच "मल्लसर" या प्राचीन जमातीचे वास्तव्य होते. आजही हि जमात केरळमध्ये आढळते. या वंशाचा उदय उस्मानाबाद येथील "तेर" या ठिकाणी झाला म्हणून हे राजे "तेर-पुराधीश" हि उपाधी लावायचे.
या वंशाचा संस्थापक हा "कपर्दिन" प्रथम हा होता. कपर्दिन हा शब्द जास्तकरून जैन धर्माशी संबंधित आहे. कपर्दि म्हणजे "जटा" हा शब्द शिवा आणि वृषभदेव यांच्याशी संबंधित आहे.
No comments:
Post a Comment