काही हजार वर्षे अगोदर ताटातूट झालेली माणसे नंतर आपल्या लोकांना भेटतात आणि आपल्याच लोकांच भल करतात हा निसर्गाचा नियम आहे.म्हणजे नदी कधीतरी सागराला मिळतेच.सुलतानी आक्रमणामुळे पुर्ण समाज हा विखुरला होता. बरेच लोक माळरानावरती मेंढपाळ करत होते.अशातच आमचे पुर्वज हिराजी-नाईक(मदने) हे सरदार बिजापूर भागातून गावात आले होते.त्यांना सधन गावची जहागीर मिलाळी होती.नाईक असुनसुद्धा त्यांनी त्यांची मुलगी एका मेंढपाळ घरात दिली होती.
त्यांनी गावात महालक्ष्मी देविचे मंदिर बनविले.मुलीकडची परिस्थिती नाजूक म्हणून मुलीकडच्या लोकांना मंदिराच्या पुजेचा मान दिला.आजपण मंदिराचे पुजारी हे शेंडगे आडनावाचे लोक आहेत.
या एका पुर्वजाची आज ५०० कुटुंबे झाली आहेत.गावातील ७०% जमिन मदने यांच्या ताब्यात आहे.गावात पाटलांचा वाडा आजही आहे.
नंतर मदने लोक शेती करु लागले.पुढे भोसले घराण्याच्या उदयानंतर गावची जहागिर अक्लकोटच्या भोसले घराण्याला मिळाली.गावात भोसले यांची तीनच कुटुंबे आहेत.
No comments:
Post a Comment