Thursday 19 February 2015

असा चालतो शेअर बाजार.


एकदा एका गावात एक माणुस आला. त्याने गावकर्यांना सांगितले की त्याला माकडे पकडायची आहेत. प्रत्येक
माकडामागे तो गावकर्यांना १००० रुपये देईल. गावकरी खुश झाले व जवळच्या जंगलात जाउन माकडे पकडायला लागले...
माकडे पकडायला गावकर्यामधे
स्पर्धाच लागली. प्रत्येक जण
माकडे पकडायचा व तो माणुस
त्यांना माकडामागे १००० रुपये द्यायचा.
काही दिवसांनी माकडे कमी सापडू लागली तेंव्हा त्या माणसाने गावकर्यांना सांगीतले
तो आता माकडामागे २०००
रुपये देईल.
गावकर्यांनी बाजुच्या जंगलातुन
माकडे आणली व माकडामागे २००० रुपये वसुल केलेत.
काही दिवसांनी त्याने माकडामागे ३००० रुपये देतो असे सांगितले व फार थोडे माकड खरेदी केले कारण
गावकर्यांना माकडे सापडेनात.
आता माकडे ५००० रुपयाला खरेदी करतो असे सांगून तो वाट बघू लागला.
गावकरी त्याला माकडे देऊ शकले नाहीत तेंव्हा तो त्यांना म्हणाला, "मी काही दिवसांत जवळच्या शहरात जाऊन येतो तो पर्यंत माकड सापडल्यास त्याच्या मदतनिसाकडे जमा करावी व तो त्यांचे पैसे देईल.."
माणुस शहरात गेल्यावर त्याचा मदतनिस गावकर्यांना म्हणाला तुम्हाला माकडे सापडत नसल्यास तो जमा झालेले माकड ४००० रुपयांना गावकर्यांना देईल व तो माणुस शहरांतुन परत आल्यावर तेच माकड गावकरी त्याला ५००० रुपयांना विकू शकतात म्हणजे त्यांना १००० रु चा फायदा होईल.
गावकर्यांना योजना पटली व त्यांनी शक्य तिथुन पैसे गोळा करुन ४००० रुपयांना एक प्रमाणे सर्व माकडे खरेदी केले. सर्व माकड ४००० रूपया प्रमाणे विकुन मदतनिस शहरात गेला.
त्यानंतर गांवकर्याना तो माणुस दिसला नाही व त्याचा मदतनिसही.
पण सर्व गावात फक्त माकड दिसु लागले.असा चालतो शेअर बाजार. ...

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/613320628800356

No comments:

Post a Comment