Wednesday 25 February 2015

आज दिनांक २६ फेब्रुवारी म्हणजेच हिंदुह्रुदयसम्राट स्वांत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा ४९ वा आत्मार्पण दिन


आज दिनांक २६ फेब्रुवारी म्हणजेच हिंदुह्रुदयसम्राट
स्वांत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा ४९
वा आत्मार्पण दिन. ज्याचा जन्म
या भारतमातेसाठी झाला त्या पुरुषसिंहाने आपले सारे
आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण केले. आणि मुख्य
म्हणजे मरणही याच देशासाठी पत्करले.
वयाच्या सोळाव्या वर्षी भारताला स्वतंत्र
करण्याची शपथ त्यांनी घेतली आणि ती अखेरपर्यंत
कायम पाळली. वयाच्या तिसाव्या वर्षी ५० वर्षे काळे
पाणी अशी सर्वात मोठी शिक्षा झालेला हा जगातील
एकमेव देशभक्त. ज्यांच्या साठी इंग्लंडच्या पंतप्रधानाने
माफी मागितली आणि फ्रान्स पंतप्रधानाने
राजीनामा दिला असा एकमेव क्रांतिकारक म्हणजे
सावरकर. भारतास स्वातंत्र्य मिळवण्यात
सिंहाचा वाटा सावरकरांचा होता. मात्र जेव्हा स्वातंत्र्य
मिळाले तेव्हा सावरकर कुटुंब मुंबईस जिवंत होते मात्र
ध्वजारोहण सोहळ्याचे साधे निमंत्रणही गांधी-नेहरुंच्य
हिंदुस्थान शासनाने त्यांना दिले नाही. सतत
त्यांचा अपमान केला, त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला.
१९४८ ला महात्मा गांधीवध झाला आणि नेहरु शाननाने
सावरकरांवर गांधी हत्येचा आरोप ठेऊन
त्यांनावयाच्या ६५ व्या वर्षी कैद केले. पुढे पुन्हा नेहरु-
लियाकत भेटीच्या वेळी वयाच्या ७० व्या वर्षी तुरुंगात
टाकले. पण तरीही या महापुरुषाने चकार शब्द
काढला नाही. थोडक्यात काय तर
ब्रिटीशांनीही सावरकरांना त्रास दिला आणि हिंदुस्थान
शासनानेही त्रासंच दिला. त्यांची शासनाने हिरावून
घेतलेली जमिन त्यांना परत केली नाही.
पुढे भारत-पाकिस्तान युद्धात भारताने विजयश्री खेचून
आणली, तरीही भारताने अन्यायकारक अटी मान्य करून
अख्या जगात अपमान करुन घेतला तेव्हा सावरकर
म्हणाले, 'यापेक्षा अधिक मी भारताचा झालेला अपमान
सहन करु शकत नाही'. असे म्हणून त्यांनी अन्नत्याग
केला आणि २६ फेब्रुवारी, १९६६ ला आपला देह ठेवला.
अशा या महापुरुषाला विनम्र अभिवादन.
अशा या देशभक्तापासून पुढील पिढीने
प्रेरणा घ्यायला हवी किंबहुना आई
वडिलांनी आपल्या मुलांना प्रेरणा घ्यायला भाग पाडावे.
गांधी नेहरुंपासून प्रेरणा घेऊन कोणाचेही भले झाले
नाही आणि होणारही नाही हे कायम लक्षात ठेवा.



No comments:

Post a Comment