Wednesday, 25 February 2015

महाराष्ट्राला प्रबोधनाची एवढी मोठी परंपरा असतानाही चित्र बदलत का नाही ?

महाराष्ट्राला प्रबोधनाची एवढी मोठी परंपरा असतानाही चित्र बदलत का नाही ?
या प्रश्नावर पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच उत्तर.-
यावर मी अनेकदा बोललो . याची कारणं अशी आहेत की , प्रबोधन म्हणा,परिवर्तन म्हणा, ते करणारा वर्ग कोणता आहे... तो शोषित आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 'अँनहिलेशन आँफ कास्ट' मध्ये सांगितल्याप्रमाणे काल ज्याच्या ढुंगणाला चड्डी नव्हती, खायला दाणा नव्हता, रहायला घर नव्हत, त्याला कोणीतरी हात दिला,संधी दिली. त्यामुळे तो 10 कोटीचा मालक झाला . आता त्याने काय करायला पाहिजे ? कधी काळी त्याच्यासारख्या बिनचड्डीच्या,बिनघराच्या माणसांना मदत केली पाहिजे . तो तसं न करता मी टाटाबिर्लाच्या शेजारच्या खुर्चीत कसा बसेल, याची आधी काळजी करतो आणी प्रस्थापितांचा एक साथीदार होतो किंवा हस्तक होतो.
बहुजन समाजातील सर्वात वाईट मानसिकता काय असेल , तर सत्ता,संपत्ती,प्रतिष्ठा या गोष्ट्री आपल्या हातून जाऊ नये, यासाठी तो व्यवस्थेला चिकटून बसतो. प्रत्यक्षात तो व्यवस्थेचा वाहक होतो आणि संरक्षकही होतो. चित्र का बदलत नाही, याचं कारण हे आहे. दुर्देवाने आपल्याकडे बहुजन समाजातील जो शिकलेला वर्ग आहे, तो प्रामाणिक राहिला नाही. आज सरकारी कार्यालयातील बहुजन समाजातील, अगदी आंबेडकरी चळवळीतील अधिकारी,कर्मचारी श्रावणात सत्यनारायण घालतात. कुठल्याही ब्राम्हणाने कार्यालयात गणपती बसविला, अस दिसणार नाही. हे असा बाडपणा सारे आपलेच, थोडक्यात सांगायच झाल्यास, प्रस्थापित व्यवस्था झिडकारायची सोडून ते त्या व्यवस्थेला कवच म्हणून वापरतात.

https://www.facebook.com/mdsaba.khan.3/posts/424687764379270

No comments:

Post a Comment