Sunday, 8 March 2015

शिवजयंति तारखेने की तिथीने ?

माझे मत " तिथीने " साजरी केली पाहिजे असे आहे. तर्कशुद्ध आणि तटस्थपणे विचार करता " तिथीने" हे उत्तर मिळते .
भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथी नुसार व्यवहार होत असत . इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगेरिअन केलेंडर्प्रमाणे व्यवहार होत.
ग्रेगेरिअन केलेंडर भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने केली पाहिजे. महात्मा फुले, गांधीजी , डॉ. आंबेडकर , टिळक या सार्यांचा जन्म भारतात इंग्रजी केलेंडर लागू झाल्यावर झाला होता . त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते . गांधिजिंच्या , टिळकांच्या किंवा अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या जन्म दाखल्यावर इंग्रजी तारीख असल्याने त्यांची जयंती इंग्रजी तारखेनुसार करणे योग्यच आहे.
तुकाराम , बसवेश्वर , शिवराय , बुद्ध या सार्यांचा जन्म भारतात इंग्रजी केलेंडर लागू करण्यापूर्वी झालेला आहे .. त्यांच्या काळात तिथीने सारे व्यवहार करत असत. त्यांचे जन्मदिवस तीथीनेच साजरे करणे योग्य ठरेल .
तिथी ऐवजी तारखेने जयंती केल्यास फार फार विश्वव्यापक आणि पुरोगामी होते या गार गार भ्रमात कोणि राहू नये .
------------------------------------------------------------------------------------
तुकाराम बीज किंवा बुद्धाची जयंती उद्या कोणि तारखेनुसार साजरी करतो म्हटले तर तो वेडाचार ठरेल . पचांग - मुहूर्त आणि तिथी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत … तिथी हे एक केलेंडर आहे त्याचा कोणत्याही धर्माशी काही संबंध नाही . हेच बर्याच जणाना समजलेले नाही
------------------------------------------------------------------------------------
आज ज्या ग्रेगेरिअन केलेंडर्ने आपण १९ फेब्रुवारी हि तारीख निश्चित करतो ते केलेंडर शिवजन्मा च्या वेळेला युरोपात सुद्धा प्रचलित नव्हते . इंग्रजांनी ग्रेगेरियन क्यालेंडर 1752 साली स्वीकारले . तो पर्यन्त जूलियन क्यालेंडर अधिकृत होते. ज्यूलिअन कालगणना व ग्रेगेरीअन कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत अधिक १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे अधिक ११ दिवसांचा फरक येतो.त्यामुळे ग्रेगेरियन केलेंडर नुसार निर्धारित १९ फेब्रुवारी तारीख चक्क १० - ११ दिवसांनी चुकते .कोणती कालगणना शिवजन्मा वेळी प्रचलित होती हेच सगळ्यात महत्वाचे आहे .
यावरच्या वाद विवादात दोन्ही बाजू एकमेकाशी बुद्ध, टिळक अशी उदाहरणे देऊन भांडतात. त्याला अर्थ उरत नाही कारण जन्माचा कालानुक्रम कोणीच लक्षात घेत नाही .
हाच कालानुक्रम त्यांच्या विचाराबाबत हि लक्षात ठेवला पाहिजे हे महत्वाचे . काळानुसार समाजाच्या नितीमत्ता धर्म याबद्दलच्या संकल्पना बदलत जातात हे हि लक्षात घेतले पाहिजे. शिवरायांचे आजच्या राजकारणासाठी अपहरण करू नये . ते जसे होते त्याबद्दल सत्यच बोलले पाहिजे . तटस्थ इतिहासकार हा प्रकार आपल्याकडे जवळ जवळ नाहीच . " शिवरायांचे स्वरूप " या विषयावर मी एक वेगळी मांडणी करणार आहे.
सध्या तारखेच्या पक्षात मत नोंदवणे हा पुरोगामी असल्याचा दाखला मानला जातो. प्रत्येक घटना आणि मुद्दा यावर स्वतंत्रपणे विचार - अभ्यास करून मत मांडले पाहिजे . यामुळे कोणता गट दुखावेल का ? असा विचार करण्याला कंपुबाजि म्हणतात अभ्यास नाहि.
उद्या सायंकाळी, ८ मार्च २०१५. सायंकाळी ७ वाजता " शिवरायांचे स्वरूप " या विषयावर बोलणार आहे . पत्ता : हनुमान मंदिरासमोर पौड गाव तालुका मुळशी . पुणे. सर्वांना हार्दिक निमंत्रण

https://www.facebook.com/abhiram.dixit.3/posts/894494597262980

No comments:

Post a Comment