काय खावे - प्यावे यावर निर्बंध लादणारे सरकार कोण ? हा मुद्दा खाद्य स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याशि निगडित आहे . धार्मिक अधिष्ठानाचे कायदे खपवून घेणार नाही . विरोध गोहत्या बंदीला नसून बुद्धीहत्येला आहे . मी स्वत: आता शाकाहारी झालो आहे . सर्व प्राणि निरागस असतात आणि त्यांना मारू नये असे व्यक्तिगत रित्या मला वाटते . ….कायदा सर्व प्राण्याबाब्त नाही. आणि स्वत:ची धार्मिक मते दुसर्यावर थोपवायला हे काही उझबेकिस्तान नाही . गायीच्या बाबतीतला कायदा धार्मिक मुद्दा समोर ठेवून केलेला आहे .
सौदी अरेबियात काफ़रानाहि सक्तीने रोजा पाळायला लागतो . आपण काही वेगळे आहोत कि नाही ? सरकारने तसाच कायदा आणला आहे . मुस्लिमांचा - ख्रिस्त्यांचा - आणि मुख्यत: पारशांचा खाद्याधीकार काढून घेणे अमानुष आहे. मानवाधिकाराची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचि पायमल्ली आहे. हिंदुच्याहि अनेक जाती गोमांस खातात . इशान्य भारतातले बहुसंख्य हिंदु गोमास खातात . महाराष्ट्रातील गोर गरिबाला त्यांच्या रोजच्या "स्वस्त " प्रोटिन सोर्स ला मुकावे लागेल . खरे पाहता वेदातही गोमेध तुरळक् प्रामाणत आहेत.... .असे काही प्रतिष्ठित अभ्यासक मानतात काही मानत नाही . वेदात काहीही लिहिलेले असो...गाय प्राणि आहे . आईची उपमा चूक … नाहीतर उद्या म्हशीला मावशी आणि बकरीला हिंदूची काकू म्हणाल ! ते काही असो हे चूक आहे….
राश्ट्र्पतिंनि सही केली म्हणजे गोहत्याबंदि कायदा घटनेला अनुसरनुच असणार आहे . पण घटना म्हणजे काही स्मृती - पुराण नाही . .....कुठल्याही ग्रंथात काही गोष्टी काळाप्रमाणे कालबाह्य होत जाणार हे सत्य आहे . मानवता , व्यक्तिस्वातंत्र्य हा घटनेचा मुलभुत उद्देश अधिक मह्त्वाचा आहे . वरवरची कलमे नाही. ....
बुद्धिवाद आणि विज्ञान निष्ठा महत्वाची ... शब्द्प्रामाण्य नाही . ... आणि बुळचट धार्मिक अधिष्ठानावर कायदे बनवणे हि बुद्धीहत्या आहे . विरोध बुद्धीहत्येला आहे.
https://www.facebook.com/abhiram.dixit.3/posts/892188980826875?fref=nf
No comments:
Post a Comment