Thursday 30 April 2015

MRP पेक्षा जास्त किम्मत आकारणे पडेल दुकान दारांना आता जास्त महाग :

 नामदार गिरीश बापट ...सन्देश
MRP पेक्षा जास्त किम्मत आकारणे पडेल दुकान दारांना आता जास्त महाग :
( JNS Update 06/04/2015 )🍹
शीत पेय,बाटली बंद पाणी आणि दूध या सारख्या गोष्टी विकताना " कूलिंग चार्ज" म्हणून दुकानदार सर्रास 1-2 रूपये जास्त घेतात .हे बेकायदेशीर आहे
तरी सुद्धा सरकार पातळी वर हा विषय फारसा गांभीर्याने घेतला जात नव्हता .कारण तक्रार केली तर काही तरी थातुर मातुर दंड देऊन तो दुकानदार सुटायचा.पण नामदार गिरीश बापट मंञी वैध मापन ( Legal Metrology) विभागाने अश्या तक्रारींची गम्भीर दखल घेऊन सदर दुकान दारां वर आणि ज्या कम्पनी चे दूध अथवा कोल्ड ड्रिंक असे जास्त किम्मती ला विकले जाईल त्या कम्पनी आणि वितरक या सर्वान् वर फौजदारी खटले दाखल करणे सुरु केलेले आहेत .

शनिवार दिनांक 4 एप्रिल 2015 रोजी एकाच दिवसात तब्बल 175 असे खटले दाखल झाले आणि दुकान मालकांना जबर दंड सुद्धा करण्यात आला .
( सम्बंधित बातमी : लोकमत पेपर दिनांक 6/04/2015 :
तरी आमची सर्व नागरिकांना विनंती आहे की दूध,पाणी अथवा कोल्ड ड्रिंक विकत घेताना एम् आर पी पेक्षा जास्त पैसे अजिबात देऊ नका.
 कोणी दुकानदार जर असे पैसे मागत असेल तर 022-22886666 या क्रमांका वर ( सरकारी कामाचे दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 या वेळेत हेल्प लाईन खुली ) त्या दुकान दाराची तक्रार करा.तक्रार दाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल .
जागो ग्राहक जागो !
आपला
नामदार गिरीश बापट
कृपया हा सन्देश सपूर्ण महाराष्ट्रा मध्ये पसरवा .

No comments:

Post a Comment