Wednesday, 25 March 2020
Monday, 23 March 2020
Friday, 20 March 2020
Thursday, 19 March 2020
हथेली के एक्यूप्रेशर पॉइंट दबाने के फायदे
कमिशनर रँड यांचे पुण्यातील प्लेगनिवारण कार्यातील योगदान
कमिशनर रँड यांचे पुण्यातील प्लेगनिवारण कार्यातील योगदान आणि त्यात अडथळा निर्माण करणारे टिळक आणि चाफेकर बंधू
करोनाची साथ देशभर पसरत आहे. ब्रिटिश सरकारने तयार केलेला साथरोग निवारण कायदा हिंदुत्ववादी भारत सरकारने आयताच देशभर लागू केला आहे. अशा वेळी सहाजिकच पुण्यातील सन१८९७ ची प्लेगची साथ, सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि प्लेग कमिशनर रँड यांचे कार्य, लोकमान्य टिळक यांचे चिथावणीखोर वर्तन आणि चाफेकर बंधूनी केलेला रँडचा खून यांची आठवण येते.
सदर प्लेगच्या साथीत सावित्रीबाई फुले या स्वत: प्लेगबाबत जनजागृतीचे व प्रबोधनाचे कार्य करीत होत्या तसेच प्लेगबाधीत रोग्यांची सेवा-सुश्रूषाही करीत होत्या. त्यातच त्यांनाही प्लेगची लागण होऊन त्यात त्या मृत्यूमुखी पडल्या.
कमिशनर रँड व त्यांची प्लेग निर्मुलन यंत्रणा प्लेग निवारणाचे कार्य धडाडीने व कसोशीने करीत होती.
लोकमान्य टिळक हे प्लेग बाबत जनजागृती व प्रबोधन करण्याचे सोडून आणि प्लेग निवारण कामात मदत व सहकार्य करण्याचे सोडून खोट्या धार्मिक भावना भडकावून प्लेग निवारण कामात अडथळे आणीत होते. त्यांच्या वृत्तपत्रांत 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय' सारखे ताळतंत्र नसलेले चिथावणीखोर अग्रलेख लिहून कमिशनर रँड यांच्या प्लेग निवारण कामात बाधा निर्माण करीत होते व लोकांना भडकावत होते.
चाफेकर बंधूंनी प्लेग निवारण कामात कुठलीच मदत व सहकार्य न करता ब्राह्मणी जातीयवादाने व खोट्या धार्मिक अहंकाराने भडकून प्लेगची साथ अत्यंत कमी कालावधीत व परिणामकारक रीतीने आटोक्यात आणून लाखो लोकांचे प्राण वाचवणा-या कमिशनर रँडचा खून केला.
साथरोग निवारण कायदा करणा-या ब्रिटिश सरकारला धन्यवाद!
प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवाभावी वृत्तीने सुश्रुषा करणा-या व त्यातच स्वत:चे प्राण गमावणा-या सावित्रीबाई फुले यांना वंदन!
प्लेगची साथ जिध्दीने कमीतकमी वेळात आटोक्यात आणून लाखो लोकांचे प्राण वाचवणा-या कमिशनर रँडना सलाम!
प्लेगच्या साथीत कोणतीही मदत व सेवाकार्य न करता लोकांना भडकावणा-यांचा व रँडचा खून करणा-यांचा निषेध!
By Mohan Patil
पुण्यात प्लेगची साथ आल्यावर रँडने कठोर उपाययोजना केली म्हणून आमचे देव बाटले म्हणत 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?' असा अग्रलेख लोकमान्य टिळकांनी लिहिला होता. पुढे यातूनच चापेकरांनी रँडचा खून केला.
आज देशात कोरोनाची महामारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर उपाययोजना करत आहेत. परंतु, काल 'देव मैदान सोडून पळाले' असा अग्रलेख लिहिणारे 'संजय राऊत' हे पत्रकार म्हणून मला टिळकांपेक्षाही श्रेष्ठ वाटतात. देवळे, मशिदी, चर्चेस बंद केल्या म्हणून बोंब ठोकणारे पत्रकार आज नाहीत उलट शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाच्या मुखपत्रातून याचे समर्थन करणारेच लिखाण होत असेल तर हे चित्र आशादायी आहे. अन्यथा चापेकर तयार व्हायला वेळ लागत नाही.
Sanjay Raut

Subscribe to:
Posts (Atom)