Tuesday, 8 December 2015

कुर्दिश सेना में ईसिस का मुकाबला करने के लिए अब महिलाओं की भी भरती


Kurdish Army has involved women’s in their forces to fight against ISIS. Kurds are descendant from ancient “Madane” Aryans of the Iran.
कुर्दिश सेना में ईसिस का मुकाबला करने के लिए अब महिलाओं की भी भरती
कुर्द प्राचीन ईरान के "मदने" आर्यों के वंशज है

"आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात.

"आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात.
काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..
काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..
काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..
आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी."
���� शुभ सकाळ ����
��आनंदी दिवसाच्या शुभेच्छा��
•█▬█αややγ ℳ๑яทïทg

https://www.facebook.com/photo.php?fbid=1030107460385203&set=a.562519287144025.1073741825.100001578772749&type=3&theater

" सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही,

" सुंदर चरित्र आणि कर्तृत्व
कुणाकडूनच उसने मिळत नाही,
ते फ़क्त स्वत:च निर्माण करावे लागते.
संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच.
परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत,
तर अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती मोठा आहे.
�� शुभ दिवस ��
"तुमचा दिवस आनंदात जावो"

महात्मा ज्योतीबा फुले" यांच्या स्मृतिदीनानिमित्त या थोर समाज सुधारकास विनम्र अभिवादन.

सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे स्रियांना चूल आणि मुल याच्या विळख्यातुन बाहेर काढून त्यांना शिक्षन घेण्याचा अधिकार प्राप्त करून देणारे तसेच स्रियांना समाजात मान सन्मान मिळवुन देणारे विश्ववंदनिय विश्वरत्न "महात्मा ज्योतीबा फुले" यांच्या स्मृतिदीनानिमित्त या थोर समाज सुधारकास विनम्र अभिवादन.

शेळीपालन सूरू करणेपूर्वी प्राथमिक बाबींची माहिती

शेळीपालन सूरू करणेपूर्वी प्राथमिक बाबींची माहिती
शेळीपालन सूरू करणेपूर्वी प्राथमिक बाबींची माहिती घेणे आवश्‍यक आहे जसे की-
1)शेळीपालन अनूभव- नवीन शेळीपालकांसाठी तसेच पारंपारीक शेळीपालकांना आधूनिकपणे शेळी पालन करणे महत्‍वाचे आहे.यासाठी प्रशिक्षण घेतल्‍यास शेळीपालनातील नवीन गोष्‍टी व सावधगिरीच्‍या बाबी तूम्‍हाला अगोदरच समजून येतील.
2)सोईसुविधा- शेळीपालनात पाळलेल्‍या जनावरांना वेळच्‍या वेळी संतूलीत चारा व खूराक, लहान व मोठया जनावरांची काळजी,योग्‍य गोठा,पाणी,लसीकरण,प्रथमोपचार इ साठीची सोय तूमच्‍याकडे उपलब्‍ध पाहिजे.उदा - एक एकरात हत्‍ती गवत [फूले जयवंत / बायफ १० ] ,मेथी घास,म्‍यलॅटो,कडवळ / मका तसेच शेवरी,सूबाभळ [नारी निर्बीजा],शेवगा, हादगा इ प्रकल्‍प सूरू होण्‍यापूर्वी लावल्‍यास ३०-३२ शेळया आपण पाळू शकतो.ही सूविधा किंवा अशा प्रकारच्‍या इइतर सूविधा शेळीपालकाकडे असणे आवश्‍यक आहे.
3)मूल्‍यवर्धन- शेळीपालकाने स्‍वतः कडील बाबीमध्‍ये मूल्‍यवर्धन करावयास हवे,जसे की लहान पिले,मादया ,नर वेगवेगळया कप्‍यात ठेवणे,त्‍यांना खूराक देणे,रोगप्रतिबंधात्‍मक उपाय योजने इ.
4)बाजार- मटणाचे मार्केटींग स्‍वतः करणे इ.
5)कर्ज- निरनिराळया बँकामधील कृषि अधिका-यांना भेटून कर्ज प्रकरणाची चाचपणी करणे.त्‍यासाठी लागणा-या कागदपत्राँची पूर्तता करणे.
अलीकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्व येत असून तो एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे हा व्यवसाय करणा-या पशुपालकांची संख्या मोठया प्रमाणावर वाढते आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायात पडू पाहत आहेत शासनही या व्यवसायाला आर्थिक सहाय देत आहे त्याचप्रमाणे शेळीच्या मांसाची मागणीही दिवसेंदिवस वाढतच आहे काही ठराविक जातीच्या शेळया दर दिवशी सरासरी दोन ते अडीच लिटर दूध देतात त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत आहे.
शेळी पालनाचे फायदे-
1) अल्प गुंतवणुकीने हा व्यवसाय केल्या जाऊ शकतो
2) शेळया या शेतक-यांसाठी बचत बॅकेचे कार्य करीत असतात आवश्यकता पडल्यास त्वरीत काही शेळया विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.
3) शेतक-यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीचा दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक मोठया प्रमाणावर आढळतात.
4) शेळया काटक असून विपरीत हवामानाशी जुळवून घेतात.
5) शेळया निकृष्ट प्रतिच्या चा-याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.
6) शेळयांचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.
7) त्यांना जागा कमी लागते यामुळे निवा-याकरिता खर्च कमी होतो.
8) काही जातीच्या शेळयापासून लोकर (मोहोर) मिळते.
9) शेळयांचे खत उत्तम असते.
10) आपल्या देशात गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.
11) शेळयांच्या शिंगापासून डिंकयुक्त पदार्थ बनवितात.
12) शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा लायसिन, मिथिओन व ट्रिप्टोफॅन शेळीच्या मासांत अधिक असते.
13) शेळीपालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केल्या जावू शकतो.
भारतीय अर्थव्यवस्थेत शेळयांचे महत्व जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते. भारतात शेळयांचे 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते भारतात शेळयांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त 58 लिटर आहे व शेळीच्या दुधाला मागणी नाही खरं तर शेळीचा विकास दुध उत्पादनाकरीता झालाच नाही आपल्या कडील निवडक जातीच्या शेळया एका वेतात 200 ते 250 लिटर दुध देतात तर विदेशी जातीच्या शेळया 1200 ते 1700 लिटर दुध देतात.
आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2.2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते.
शेळयांच्या जाती
भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दुध उत्पादनाकरिता तर बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल,उस्मानाबादी,सिरोही सुर्ती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते साधारणपणे एका वर्षात सरासरी वजन 20 किलो होते या उलट विदेषी जातीच्या शेळया उदा सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार जाती फारच झपाटयाने वाढतात. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो असते आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.वरील ठळक अक्षरात दिलेल्‍या शेळयांच्‍या जाती तूम्‍ही मटण / दूधासाठी पाळू शकता.
अर्धबंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता -
शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपे खातात जर आपण शेळयांचे अर्धबंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.
अर्धबंदीस्त शेळीचे व्यवस्थापन -
1) शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया
प-हाटया यांच्या सहायाने करावे
2) प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी
3) शेळयांना मोकळया जागेत ठेवावे
4) कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा
5) गाभळ शेळयाची व दुभत्या शेळयाची विशेष काळजी ध्यावी
6) करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी
7) दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळयांचे निरीक्षण करावे आजारी शेळयांना अगक करून पशुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत
8) शेळयाबांबत नोंदी ठेवाव्या व्याल्याची तारीख, शेळया फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी
शेळीपालनाची वैशिष्टये
* शेळी कुठल्याही हवामानात जगू शकते. विशेषतः उष्ण व कोरडया हवामानात शेळीची वाढचांगली होते.
* शेळीच्या आहारात मुख्यत्वेकरून झाडांचा पाला असतो. त्यात बाभूळ, चिंच, पिंपळ, शेवरी, बोर, अंजन यांचा समावेश होतो.
* शेळीसाठी जागा कमी लागते. भांडवल कमी लागते.
* शेळीचा गर्भकाळ इतर दुभत्या पाळीव जनावरांच्या
गर्भकाळापेक्षा कमी म्हणजे १५० दिवस इतक्या कालावधीचा असतो व भाकडकाळ कमी असतो.
* शेळीचे दुध पचनास हलके असते व लहान मुलांना देण्यासाठी अधिक उपयुक्त असते.
* शेळीच्या लेंडीखताला सेंद्रीय खत म्हणून फार किंमत आहे. टाक शेळी वर्षाला २०० किलो लेंडीखत देते.
शेळ्यांचे व्यवस्थापन
* शेळ्यांना मोठया गोठयांची आवश्यकता नसते. उसाचे पाचट किंवा गवत वापरून तयार केलेले छप्पर, ऊन वाऱ्यापासून आडोसा होण्याइतपत चार फुट उंचीची भिंत व त्या ठिकाणी खाद्याची व्यवस्था इत्यादी सोयी असलेला गोठा शेळ्यांकरिता उत्तम आहे.
* बंदिस्त जागा प्रत्येकी १२ चौ. फुट व मोकळी जागा प्रत्येकी २५ चौ. फुट असावी.
* खाद्याचे प्रमाण साधारणतः प्रतिदिनी हिरवा चारा तीन – चार किलो, वाळलेला चारा राक किलो. टाक लीटर पेक्षा जादा दुध देणाऱ्या शेळ्यांना १०० ते २०० ग्रामपर्यंत खुराक देणे आवश्यक आहे.
* शेवरी, अंजन, हदगा, बाभूळ, सुबाभूळ, बोर, वड व पिंपळ झाडांचा पाला व फळे शेतीला आवडतात.
* प्रत्येक शेळीस दर दिवशी तीन ते चार लीटर पाणी प्यावयास लागते.
करडांची जोपासना
* करडू जन्माला आल्यानंतर नाळ कापणे, नख्या कोरणे व सहा तासांच्या आत पहिले दुध पाजणे महत्वाचे आहे.
* करडू जन्माला आल्यानंतर पहिल्या २४ तासांत पिईल तेवढा चिक त्यास पिऊ देणे आवश्यक असते.
* करडयाच्या वजनाच्या राक अष्टमांश इतका चीक प्रत्येक दिवशी त्यास पाजणे गरजेचे आहे.
म्हणून शेळीपालन कमी जोखमीचा आणि उत्तम आर्थिक लाभ मिळवून व्यवसाय देणारा आहे.

" रणसंग्रामातील फ्रान्स नावाचा योद्धा !"

" रणसंग्रामातील फ्रान्स नावाचा योद्धा !"
पॅरिसवरील अत्यंत भीषण आक्रमणातून केवळ दोनच दिवसांत सावरत फ्रान्सने आय.एस्.आय.एस्. वर केलेल्या धाडसी हवाई आक्रमणांना दाद द्यावी लागेल. फ्रान्सच्या या कृतीला कुणी उपटसुंभ व्यक्ती आततायी ठरवील, कुणी असहिष्णु म्हणेल, तर कुणी पुस्तकी विचारवंत त्यांच्यावर अविचारी कृतीचा ठपका ठेवील. वाघाला घायाळ केले की, तो दुप्पट ताकदीने आक्रमण करतो. फ्रान्सची कृती ही घायाळ वाघापेक्षा वेगळी नाही. अन्यायाचा सूड तात्काळ उगवणे म्हणजे नेमके काय असते, हे फ्रान्सने जगाला दाखवून दिले. अर्थात् अशी कारवाई करणारे फ्रान्स हे पहिले आणि एकमेव राष्ट्र नव्हे. यापूर्वी अमेरिकेनेही अफगाणिस्तान आणि इराकमध्ये सैन्य घुसवून शत्रूचा सूपडा साफ केला आहे. भेद इतकाच की, अफगाणिस्तानमधील आतंकवादी एकेकाळी अमेरिकेनेच पोसलेे होते आणि ते डोईजड झाल्यावर त्यांचा नि:पात केला, तर फ्रान्सला अशी कोणतीही स्वार्थी पार्श्वभूमी नव्हती.
समाजमनाची युद्धभूमी !
फ्रान्सने सिरियातील रक्का या आय.एस्.आय.एस्. च्या अधिपत्याखाली असलेल्या शहरावर आक्रमण केले. फ्रान्सच्या २० बॉम्बनी रक्कातील आय.एस्.आय.एस्.चे प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केले. फ्रान्सच्या या धडक कारवाईत अमेरिकेचाही सहभाग होता. अन्य राष्ट्रांत जाऊन त्यांच्यावर आक्रमण करणे मूळीच सोपे नसते. फ्रान्सने सिरियावर आक्रमण करून ४८ घंटे उलटले; पण अजूनपर्यंत जगातील एकाही राष्ट्राने फ्रान्सवर टीका केली नाही वा त्याचा निषेधही केला नाही. याऊलट त्यांच्या धाडसाचे कौतुकच झाले. हीच या कारवाईची पोचपावती म्हणावी लागेल. फ्रान्सने सिरियावर आक्रमण करण्यापूर्वी कुणाकडे हात पसरले नाहीत. हा देश या आक्रमणात आय.एस्.आय.एस्.चा सहभाग असल्याचे कुणालाही पुरावे सादर करत बसला नाही. भारतातील काँग्रेसी मानसिकतेची बांडगुळे तेथे नसल्यामुळे कारवाईला कुणीही आडकाठी केली नाही. आपल्याकडे मोठा निर्णय घेण्यापूर्वी वर्षांनुवर्षे पार पाडला जाणारा (निष्फळ) बैठकांचा सोपस्कार फ्रान्सने अवघ्या काही घंट्यांत उरकून लढाऊ विमानांना थेट अवकाशाचा रस्ता दाखवला. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण केेलेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेचे समुपदेशन घेण्यात या देशाने वेळ दवडला नाही. आक्रमणातील निष्पाप नागरिकांचे छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह आणि त्यांच्या आप्तस्वकियांचा आक्रोश पाहून फ्रान्समधील प्रत्येक नागरिकाच्या मुठी आवळल्या अन् त्यांचे मन युद्धभूमी बनले. तेथील बाणेदार प्रसारमाध्यमांनी भारतीय प्रसारमाध्यमांप्रमाणे रंजक बातम्या देऊन स्वत:चा टी.आर्.पी. न वाढवता आय.एस्.आय.एस्.च्या आक्रमणाला थेट युद्ध संबोधून शासनाच्या कारवाईतील उरलेसुरले अडथळे दूर केले. या बळावरच फ्रान्सला दोनच दिवसांत रक्कावर आक्रमण करणे शक्य झाले. देशाच्या मूळावर उठलेल्या शत्रूविषयी असलेली चीड, त्याला धडा शिकवण्याचा प्रबळ आणि सुस्पष्ट निश्चय अन् त्याला धडक कृतीची जोड, ही त्रिसूत्री फ्रान्सच्या बाहूंना बळ पुरवणारी ठरली.
भारत काय बोध घेणार ?
रक्कावरील आक्रमणाने आय.एस्.आय.एस्.ची किती हानी झाली हे सूत्र एकवेळ गौण आहे; पण फ्रान्सची तत्पर आणि तितकीच बेधडक कृती ही भारतासारख्या आतंकवादग्रस्त राष्ट्रांना अन्यायाचा सूड तत्परतेने कसा उगवावा, याचे दिशादर्शन करणारी ठरली. एरव्ही युरोपीय राष्ट्रे भारतात जिहादी आतंकवादाने घातलेले थैमान खिडकीतून मजा पाहिल्याप्रमाणे पहात होेती; पण पॅरिसवरील भीषण आतकंवादी आक्रमणाने जिहादी आतंकवाद नेमका कसा असतो, हे युरोपने प्रत्यक्ष अनुभवले. मुंबईवरील आक्रमणात पाकचाच हात असल्याचे ढळढळीत पुरावे हाती असूनही भारताने पाकवर आजपर्यंत कारवाई केली नाही. उलट पाकशी मैत्रीचा हात सतत पुढे केला ! षंढपणाचे याहून मोठे दुसरे कुठले उदाहरण असू शकेल ? याच षंढपणाला आपल्याकडे कदाचित् सहिष्णुता म्हणत असावेत ! पाकच्या आतंकवादी आगळीकतेवर कृतीशून्य राहून जगाला आम्ही सहिष्णु आहोत, असे वेळोवेळी सांगणार्या भारतीय राज्यकर्त्यांनी फ्रान्सने केलेल्या आक्रमणानंतर त्यांना जगातील एकाही राष्ट्राने असहिष्णु ठरवले नाही, हे प्रकर्षाने लक्षात घेतले पाहिजे. याबरोबरच हेही जाणले पाहिजे की, पाकच्या विरोधात भारताला नेहमी सबुरीने घेण्याचा सल्ला देणारी धूर्त अमेरिका फ्रान्सला सिरियावर आक्रमण करण्यासाठी मात्र कृतीशील साहाय्य करते. पॅरिस आणि मुंबई येथील जिहादी आक्रमणांत पुष्कळ समानता होती; पण दोन्ही राष्ट्रांच्या आक्रमणानंतरच्या अमेरीकेच्या भूमिकेत मात्र भूमी-आकाशाएवढा भेद होता. थोडक्यात प्रत्येकाला स्वत:च्या देशातील आतंकवादाविरुद्धची लढाई स्वत:च लढावी लागते, हाच बोध फ्रान्सच्या कृतीतून घेऊन आपण कृतीशील झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यकता आहे प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची आणि समस्त नागरिकांनी एकजूट आणि प्रखर राष्ट्राभिमान दाखवण्याची !

चित्तौड़गढ़ दुर्ग भारत का सबसे विशाल दुर्ग है।

चित्तौड़गढ़ दुर्ग भारत का सबसे विशाल दुर्ग है। यह राजस्थान के चित्तौड़गढ़ में स्थित है जो भीलवाड़ा से कुछ किमी दक्षिण में है। यह एक विश्व विरासत स्थल है। चित्तौड़ मेवाड़ की राजधानी थी।
ऐतिहासिकता तथा निर्माण:
इतिहासकारों के अनुसार इस किले का निर्माण मौर्यवंशीय राजा चित्रांगद ने सातवीं शताब्दी में करवाया था और इसे अपने नाम पर चित्रकूट के रुप में बसाया। मेवाड़ के प्राचीन सिक्कों पर एक तरफ चित्रकूट नाम अंकित मिलता है। बाद में यह चित्तौड़ कहा जाने लगा। सन् ७३८ में गुहिलवंशी राजा बाप्पा रावल ने राजपूताने पर राज्य करने वाले मौर्यवंश के अंतिम शासक मानमोरी को हराकर यह किला अपने अधिकार में कर लिया। फिर मालवा के परमार राजा मुंज ने इसे गुहिलवंशियों से छीनकर अपने राज्य में मिला लिया।