Wednesday, 27 January 2016

सांगलीच्या तेजस लेंगरेची यशोगाथा, 150 शेळ्यांच्या माध्यमातून वर्षाला 20 लाखांची उलाढाल..

सांगलीच्या तेजस लेंगरेची यशोगाथा, 150 शेळ्यांच्या माध्यमातून वर्षाला 20 लाखांची उलाढाल..
हि माहिती आपल्या सर्व मित्रापर्यंत शेयर/SHARE करा
सांगली जिल्ह्यातल्या बामणीचे लेंगरे कुटूंब मुळत: मेंढपाळ. घरची परिस्थिती बदलली आणि घरच्यांवर मोलमजुरी करण्याची वेळी आली. १९९९ साली तेजस १० वी उत्तीर्ण झाला. पिकअप गाडी विकत घेउन मालवाहतूक करु लागला आणि इथचं त्याचा संबंध पुन्हा आला आपल्या परंपरागत व्यवसायाशी आला.
साताऱ्यातील फलटन इथला एक शेळीपालन व्यवसाय त्यानं पाहीला आणि त्याला शेळीपालनातून समृध्दीचा त्याला मार्ग सापडला.
150 शेळ्या आणि वर्षाकाठी 20 लाखांची उलाढाल
२००६ साली तेजसनं आफ्रिकन बोअर जातीचा एक नर आणि एक मादी खरेदी केली आणि शेळीपालन व्यवसायास सुरुवात केली. सुरुवातीला माद्या तशाच ठेऊन अतिरिक्त नरांची तो विक्री करायचा. त्यामुळं शेळ्याच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत राहीली. दोन शेळ्यांपासून सुरु केलेला तेजसचा हा शेळीपालनचा व्यवसाय आज १५० शेळ्यांवर येऊन पोहचला आहे आणि यातून तेजस तब्बल 20 लाखांची उलाढाल करतो.
व्यवसाय जसा वाढला तसं तेजसचं लहान शेड कमी पडू लागलं. त्यामुळं तेजसनं १३० बाय ५० फूट लांबीचं नविन शेड उभारलं. त्यात नर, माद्या आणि लहान पिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. लोखंडी पट्ट्यां वापरून गाळे बंदिस्त केले. खाद्य देण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. जमिनीवर शहाबादी फरशी वापरली. त्यामुळं गोचिड आणि पिसवांचा त्रास कमी झाला.
२० गुंठ्यात चारा पिकाची लागवड
तेजसकडं सध्या लहान मोठ्या मिळून १५० शेळ्या आहेत. चाऱ्यासाठी शेजारील २० गुंठ्यावर चारा पिकाची लागवड केली आहे. दिवसातून तीन वेळा या शेळ्यांना त्यांच्या गरजेनुसार चारा दिला जातो. तसंच पाण्यातून प्रथिनं पावडर दिली जाते. त्यामुळं शेळ्यांच्या वजनात वाढ होते. २१ दिवसांनंतर जंताचे औषध दिले जातं. तर दर तीन महिन्यांतून एकदा लसीकरण केले जातं. त्यामुळं या शेळ्या रोगांना बळी पडत नाही.
आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्या, नर, मादी आणि पिलांसाठी स्वतंत्र शेड
तेजसनं शेळ्याची अत्यंत चांगल्या पध्दतीनं जोपासना केली आहे. त्यामुळं इथले नर धष्टपुष्ट आहेत. आफ्रिकन बोअर जातीत जुळे पिलं होण्याचं प्रमाण जास्त आहे. तसंच या जातीच्या नरांचे वजन दीड वर्षात १२० किलोपर्यंत होते. त्यामुळं तेजसला अधिक उत्पादन मिळतं.
ईदीचे बोकड लाखाच्या घरात
बकरी ईदला यातील नरांचे तेजसला ७० हजार ते १ लाखांपर्यंत पैसे मिळतात. तसंच इतर शेळ्यांची तेजस दर तीन ते साडेतीन महिन्यांनी प्रजननासाठी विक्री करतो. त्यातून त्याला दीड हजार रुपये किलोच्या दरानं पैसे मिळतात आणि यासाठी त्याला बाजारपेठ शोधावी लागत नाही. तर व्यापारी जागेवर येऊनच या शेळ्या घेउन जातात.
मागील वर्षी तेजसनं २५ नर आणि ३५ माद्यांची विक्री केली. त्यातून त्याला २० लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. यातून ५ लाखांचा उत्पादन खर्च वजा जाता तेजसला १५ लाखांचा निव्वळ नफा झाला. यासोबतच २२ ट्रॉली लेंडीखताच्या विक्रीतून अतिरिक्त ५० हजारांचं उत्पन्न मिळालं.

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/751943358271415

https://www.facebook.com/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A5%E0%A4%BE-275409849317432/

भरलेला खिसा माणसाला "जग" दाखवतो ... आणि रिकामा खिसा याच जगातली "माणसं" दाखवतो..

��भरलेला खिसा माणसाला "जग" दाखवतो ... आणि रिकामा खिसा याच जगातली "माणसं" दाखवतो.. ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकतघेता येतं त्याला उचलता येत नाही. ''विचित्र आहे पण सत्य आहे''. आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर..... !! जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती...!! चांगले मित्र आणि औषधे हि आपल्या आयुष्यातील वेदना दुर करायचे काम करतात.फरक इतकाच कि, औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही.... 
��खास तुमच्या सारख्या मित्रांसाठी��

Tuesday, 26 January 2016

"रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण धेय्य सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका. त्या रस्त्यावर चालत रहा."

"रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण धेय्य सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका. त्या रस्त्यावर चालत रहा."
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...
एक माणुस विस पंचवीस लोकाना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणुस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदया वर राज्य करु शकतो..
�� शुभ प्रभात ��.

Solve this if you are genius!

Solve this if you are genius!
8=56
7=42
6=30
5=20
3=?


https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/749480618517689

Insan ki Samajh by Anupam kher

https://www.facebook.com/anupamkherofficial/photos/a.1468597396796915.1073741829.1442540512735937/1536036176719703/?type=3&theater#