Tuesday 17 February 2015

मी कसा घडलो' (या आर. आर. पाटील यांच्या जीवनचरित्रातून संपादित, साभार)



आबांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा घरची गरिबी होती. गरिबी किती टोकाची होती ती आबांना जवळून अनुभवायला मिळालं...


एकदा आबांचा शर्ट खूप फाटला होता, एकच होता. आबा सकाळी सुईदोरा घेऊन आईकडे गेले व म्हणाले, ''हा कसातरी शिवून दे.'' 
वैतागलेली आई म्हटली, ''आता कुठं शिवायचं..?''
...म्हटलं घालायचं काय? सहज वर नजर गेली. वडिलांच्या मुत्युनंतर त्यांचे जुने झालेले कपडे एका गाठोड्यात बांधून वर ठेवलेले होते. आईची नजर चुकवून ते सगळे जुने कपडे काढले. वडील जे मृत झाले होते, आणि मृत व्यक्तीचे कपडे वापरत नाहीत. पण, वडिलांचे जुने कपडे घेऊन मी टेलरकडे गेलो. कपडे शिवतानां टेलरने ओळखले की, हे माझ्या वडिलांचे कपडे आहेत... त्रयस्थ, लिंगायत समाजाचा टेलर; पण माझ्या अंगावरचा शर्ट आणि वडिलांचे कपडे बघून त्यांच्याही डोळ्यांमध्ये पाणी आलं... 
त्यावेळी अल्टर करुन, ती कापडं घालून मी घरात गेलो... त्यावेळी वडिलांच्या मृत्युनंतरसुध्दा न रडलेली माझी आई त्या दिवशी मला छातीशी धरुन इतकी रडली.. नि मीही भरभरुन रडलो. आयुष्यातील तो दिवस सगळ्यात वाईट दिवस होता. पण, तशाही परिस्थितीत आम्ही शिकलं पाहीजे, ही तिची जिद्द कायमची होती... मी रोजगार हमी योजनेवर शिकत राहिलो... अन आज महाराष्ट्र राज्याचा ग्रहमंञी म्हणून तुमच्या समोर खंबीरपणे उभा आहे...
''कोशिश करनेवालों की कभी हार नही होती''...

'मी कसा घडलो' 
(या आर. आर. पाटील यांच्या जीवनचरित्रातून संपादित, साभार)

https://www.facebook.com/SakalNews/photos/a.58765531972.73235.55436896972/10152746679966973/?type=1&theater


No comments:

Post a Comment